Varyavarti Gandh

3 views

Lyrics

वाऱ्यावरती गंध पसरला नाते मनाचे
 मातीमध्ये दरवळणारे हे गाव माझे
 वाऱ्यावरती गंध पसरला नाते मनाचे
 मातीमध्ये दरवळणारे हे गाव माझे
 जल्लोष आहे आता उधाणलेला
 स्वर धुंद झाला मनी छेडलेला
 शहारलेल्या, उधाणलेल्या कसे सावरावे?
 ♪
 वाऱ्यावरती गंध पसरला नाते मनाचे
 मातीमध्ये दरवळणारे हे गाव माझे
 ♪
 स्वप्नातले गाव माझ्यापुढे
 दिवसाचा पक्षी अलगद उडे
 फांदीच्या अंगावरती चिमणी ती चिवचिवणारी
 झाडात लपले सगे-सोयरे
 हा गाव माझा जुना आठवाचा
 नादात हसऱ्या त्या वाहत्या नदीचा
 ढगात उरले पाऊस गाणे कसे साठवावे?
 ♪
 Hey, वाऱ्यावरती गंध पसरला नाते मनाचे
 मातीमध्ये दरवळणारे हे गाव माझे
 ♪
 हातातले हात मन बावरे
 खडकाची माया कशी पाझरे
 भेटीच्या ओढीसाठी श्वासांचे झुंबर हलते
 शब्दांना कळले हे गाणे नवे
 ही वेळ आहे मला गोंदणारी
 ही धुंद नाती गंधावणारी
 पुन्हा एकदा उरी भेटता कसे आवरावे?
 वाऱ्यावरती गंध पसरला...
 मातीमध्ये दरवळणारे...
 I like the cool breeze
 Blowing over my face
 I like the cool breeze
 Blowing on my face
 

Audio Features

Song Details

Duration
04:54
Key
3
Tempo
95 BPM

Share

More Songs by Kunal Ganjawala

Albums by Kunal Ganjawala

Similar Songs