Kanha

1 views

Lyrics

का उमगं ना, कसं का समजं ना?
 लागिरं हे तुझं मोहना, सरं ना
 का तळमळ, मन का घुटमळं?
 हरवलं काळीज राधेला कळं ना
 मुरलीचा सूर जुळतो
 जीव जळतो त्या घडीला पुन्हा
 ताल ऱ्हाईला न्हाई पावलांना
 घे तुझ्याच सावलीत कान्हा
 ताल ऱ्हाईला न्हाई पावलांना
 घे तुझ्याच सावलीत कान्हा
 ♪
 का संगतीचं सुख खुणावत राही रं?
 का बिलगून मन रितं-रितं राही रं?
 का गुतलेलं जिणं उसवत राही रं?
 का पुनवंच्या संगतीला चांद नाही रं?
 अवघड ही विरहाची कळं साही ना
 नजर आता जग तुझ्याईन पाही ना
 मुरलीचा सूर जुळतो
 जीव जळतो त्या घडीला पुन्हा
 ताल ऱ्हाईला न्हाई पावलांना
 घे तुझ्याच सावलीत कान्हा
 ताल ऱ्हाईला न्हाई पावलांना
 घे तुझ्याच सावलीत कान्हा
 

Audio Features

Song Details

Duration
04:03
Key
1
Tempo
126 BPM

Share

More Songs by Ajay-Atul

Albums by Ajay-Atul

Similar Songs