Lallati Bhandar

4 views

Lyrics

नदीच्या पल्याड आईचा डोंगुर
 नदीच्या पल्याड आईचा डोंगुर
 डोंगरमाथ्याला देवीचं मंदिर
 डोंगरमाथ्याला देवीचं मंदिर
 घालु जागर-जागर डोंगर माथ्याला
 घालु जागर-जागर डोंगर माथ्याला
 घे लल्लाटी भंडार, दूर लोटून दे अंधार
 आलो दुरुन रांगून, डोंगर येंगून, उघड देवी दार
 ए, लल्लाटी भंडार, दूर लोटून दे अंधार
 आलो दुरुन रांगून, डोंगर येंगून, उघड देवी दार, आहा
 ♪
 नदीच्या पाण्यावर आगीनं फुलतं
 नदीच्या पाण्यावर आगीनं फुलतं
 तुझ्या नजरेच्या तालावर काळीज डुलतं
 तुझ्या नजरेच्या तालावर काळीज डुलतं
 नाद आला गं, आला गं जीवाच्या घुंगराला
 नाद आला गं, आला गं जीवाच्या घुंगराला
 घे लल्लाटी भंडार, दूर लोटून दे अंधार
 आलो दुरुन रांगून, डोंगर येंगून, उघड देवी दार
 ए, लल्लाटी भंडार, दूर लोटून दे अंधार
 आलो दुरुन रांगून, डोंगर येंगून, उघड देवी दार, आहा
 (नवसाला पाव तू, देवी माझ्या हाकंला धाव तू)
 (हाकंला धाव तू, देवी माझ्या अंतरी ऱ्हावं तू)
 (देवी माझ्या अंतरी ऱ्हावं तू, काम, क्रोध परतुनी लाव तू)
 (काम, क्रोध परतुनी लाव तू, देवी माझी पार कर नाव तू)
 ♪
 डोळा भरून तुझी मुरत पाहीन
 मुरत पाहीन, तुझा महिमा गाईन
 महिमा गाईन, तुला घुगऱ्या वाहीन
 घुगऱ्या वाहीन, तुझा भंडारा खाईन
 दृष्ट लागली-लागली हळदीच्या अंगाला
 दृष्ट लागली-लागली हळदीच्या अंगाला
 ए, लल्लाटी भंडार, दूर लोटून दे अंधार
 आलो दुरुन रांगून, डोंगर येंगून, उघड देवी दार
 ए, लल्लाटी भंडार, दूर लोटून दे अंधार
 आलो दुरुन रांगून, डोंगर येंगून, उघड देवी दार, आहा
 (यल्लम्मा देवीचा जागर ह्यो, भक्तीचा सागर)
 (निवदाची भाकर दाविती ही जमल्या गं लेकरं)
 (Hey, पुनवंचा चांदवा देवीचा गं मायेचा पाझर)
 (आई तुझा मायेचा पाझर जागर ह्यो, भक्तीचा सागर)
 ♪
 खण-नारळानं वटी मी भरीन
 वटी मी भरीन, तुझी सेवा करीन
 सेवा करीन, तुझा देवारा धरीन
 देवारा धरीन, माझी ओंजळ भरीन
 आई सांभाळ-सांभाळ कुशीत लेकराला
 आई सांभाळ-सांभाळ कुशीत लेकराला
 घे लल्लाटी भंडार, दूर लोटून दे अंधार
 आलो दुरुन रांगून, डोंगर येंगून, उघड देवी...
 ए, लल्लाटी भंडार, दूर लोटून दे अंधार
 आलो दुरुन रांगून, डोंगर येंगून, उघड देवी दार, आहा
 (यल्लम्मा देवीचा जागर ह्यो, भक्तीचा सागर)
 (निवदाची भाकर दाविती ही जमल्या गं लेकरं)
 (Hey, पुनवंचा चांदवा देवीचा गं मायेचा पाझर)
 (आई तुझा मायेचा पाझर जागर ह्यो, भक्तीचा सागर)
 
Audio Features

Song Details

Duration
05:01
Key
6
Tempo
130 BPM

Share

More Songs by Ajay-Atul

Albums by Ajay-Atul

Similar Songs