Kaivalya Gaan
6
views
Lyrics
कंठात आर्त ओळी, डोळ्यात प्राण आले आता समेवरी हे कैवल्यगान आले ॥ ध्रु॥ चरणांवरी स्वरांच्या मी टेकवून माथा अर्पुन चाललो ही माझी अबोल गाथा भवताल ऐहिकाचे दोलायमान झाले ॥१॥ पैलावरून आला ओंकार नाद कानी ही दाद ओळखीची नी सोयरी विराणी संचित युगायुगांचे एका क्षणी मिळाले ॥२॥ या मैफिलीत आता मी तू कुणीच नाही घे रे सुखात घे रे घे ईश्वरा तिहाई लयताल सूर सारे शून्यात एक झाले ॥३॥
Audio Features
Song Details
- Duration
- 05:50
- Key
- 10
- Tempo
- 120 BPM