Ye Jeevlaga Ye

4 views

Lyrics

ये जिवलगा ये
 ये जिवलगा ये, ये जिवलगा ये
 भिजून जाऊ असे प्रणयातच विसरू जगा
 आय, हाय, हाय, हाय, हाय
 ये जिवलगा ये, ये जिवलगा ये
 भिजून जाऊ असे प्रणयातच विसरू जगा
 आय, हाय, हाय, हाय, हाय, हाय
 काय असा प्रणय जुळतो
 तम इथला कधी न ढळतो
 बघ तुझे हे यौवन जाईल सुकूनी उगा
 हाय, हाय, हाय, हाय, हाय, हाय
 ये जिवलगा ये, ये जिवलगा
 मनातली ही प्रीती जन्मो-जन्मीची
 या प्रीतीची बोली चार नयनांची
 उमले कविता झुळुक लहरता वाऱ्याची
 ती भाषा असते रे स्पर्शाची
 मनातली ही प्रीती जन्मो-जन्मीची
 हो, या प्रीतीची बोली चार नयनांची
 उमले कविता झुळुक लहरता वाऱ्याची
 ती भाषा असते रे स्पर्शाची
 प्रीत खुळ्या तु उमल फुला
 मदन मिळो गं सजण तुला
 तुजविना मनमीत नको मज कुणीही दुजा
 हाय, हाय, हाय, हाय, हाय
 ये जिवलगा ये, ये जिवलगा ये
 ये जिवलगा
 या चांदवेड्या रातीला मी कवळीले
 सख्या, झाले तुझी चांदणी
 या ढगावर, राया, अशी चहुडले
 पुरी बेभान मी होऊनी
 तुझ्या संगतीनं दिसे मज दुनिया
 आकाशाच्या तारांगणी
 मदनाच्या पाऱ्याची नवखी किमया
 झाली सखे-साजणी
 या चांदवेड्या रातीला मी कवळीले
 सख्या, झाले तुझी चांदणी
 दोन्ही दिवाणे मने धुंद झाली
 प्रीती अशी ही अमर आपुली
 बहर आज नवा प्रेमाचा ऋतू सजला
 हाय, हाय, हाय, हाय, हाय, हाय
 ये दिलरुबा ये
 ये दिलरुबा ये, ये दिलरुबा ये
 जवळ ये सखी, आज दिले मी हृदय तुला
 हाय, हाय, हाय, हाय, हाय, हाय
 ये जिवलगा ये
 ये दिलरुबा ये
 ये जिवलगा ये
 ये दिलरुबा ये

Audio Features

Song Details

Duration
05:11
Key
8
Tempo
126 BPM

Share

More Songs by Lata Mangeshkar

Albums by Lata Mangeshkar

Similar Songs