Saibabala Visru Naka
3
views
Lyrics
आई-बापाहुन मायाळू या साईबाबाला विसरू नका आई-बापाहुन मायाळू या साईबाबाला विसरू नका तो नाथ असे या अनाथांचा ह्या नाथाला विसरू नका आई-बापाहुन मायाळू या साईबाबाला विसरू नका ♪ तो देतो तुम्हा सर्व काही स्वतःसाठी कधी ना मागितले तुम्हा जे-जे हवे ते त्याने दिधले कधी काही उडे नाही केले ज्या हातांनी घेता तुम्ही ते हात कुठे पसरू नका आई-बापाहुनी मायाळू या साईबाबाला विसरू नका ♪ त्या दगडावरती बैसुनिया तो देई निवारा आपल्याला धरी छाया भक्तावर आपली ऊन, वारा जरी लागे त्याला जरी धरणी सारी हादरली म्हणे, "भक्तांना हादरू नका" आई-बापाहुनी मायाळू या साईबाबाला विसरू नका ♪ त्याच्या पोटाला असले, नसले भक्तांच्या पोटाची चिंता तो आहे भुकेला भक्तीचा तो सर्वांचा आहे दाता तुम्हा काय हवे ते सांगाया आणि मागाया कचरू नका आई-बापाहुनी मायाळू या साईबाबाला विसरू नका ♪ त्याने डौल कधी नाही केला ना थाट कधी केला भारी अलंकार रहित राहून त्याने ही नटविली दुनिया सारी श्रद्धा-सबुरी हे ज्ञान दिले अज्ञान बनून बिखरू नका आई-बापाहुन मायाळू या साईबाबाला विसरू नका तो नाथ असे या अनाथांचा ह्या नाथाला विसरू नका ♪ ज्या दृष्टीने न्हाहाळाल तुम्ही त्या दृष्टीने पाहिल तुम्हा ज्या आस्थेने शोधाल तुम्ही त्या आस्थेने शोधील तुम्हा अवलंब करा त्या प्रगतीचा हरेन्द्रासम घसरू नका आई-बापाहुन मायाळू या साईबाबाला विसरू नका तो नाथ असे या अनाथांचा ह्या नाथाला विसरू नका साईबाबाला विसरू नका
Audio Features
Song Details
- Duration
- 06:07
- Key
- 8
- Tempo
- 99 BPM