Gagan Sadan Tejomaya - Umbartha / Soundtrack Version
5
views
Lyrics
गगन, सदन तेजोमय गगन, सदन तेजोमय तिमिर हरून करुणाकर दे प्रकाश, देई अभय गगन, सदन तेजोमय, गगन, सदन ♪ छाया तव, माया तव, हेच परम पुण्यधाम छाया तव, माया तव, हेच परम पुण्यधाम वाऱ्यातून, ताऱ्यातुन वाचले तुझेच नाम जगजीवन, जनन-मरण जगजीवन, जनन-मरण हे तुझेच रूप सदय गगन, सदन तेजोमय, गगन, सदन ♪ वासंतिक कुसुमांतून वासंतिक कुसुमांतून तूच मधुर हासतोस मेघांच्या धारांतुन प्रेमरूप भासतोस कधि येशील चपलचरण? कधि येशील चपलचरण? वाहिले तुलाच हृदय गगन, सदन तेजोमय, गगन, सदन ♪ भवमोचन हे लोचन तुजसाठी दोन दिवे भवमोचन हे लोचन तुजसाठी दोन दिवे कंठातील स्वर मंजुळ, भावमधुर गीत नवे सकलशरण, मनमोहन सकलशरण, मनमोहन, सृजन तूच, तूच विलय गगन, सदन तेजोमय गगन, सदन तेजोमय गगन, सदन तेजोमय गगन, सदन तेजोमय गगन, सदन
Audio Features
Song Details
- Duration
- 04:37
- Key
- 5
- Tempo
- 131 BPM