Karunatripadi

3 views

Lyrics

शांत हो श्रीगुरुदत्ता मम चित्ता शमवी आतां
 शांत हो श्रीगुरुदत्ता मम चित्ता शमवी आतां
 (तू केवळ माता जनिता, सर्वथा तू हितकर्ता)
 (तू आप्तस्वजन भ्राता, सर्वथा तूचि त्राता)
 भयकर्ता तू भयहर्ता, दंडधर्ता तू परिपाता
 तुजवाचुनि न दुजी वार्ता
 तू आर्ता आश्रय दत्ता
 शांत हो श्रीगुरुदत्ता मम चित्ता शमवी आता
 शांत हो श्रीगुरुदत्ता मम चित्ता शमवी आता
 (अपराधास्तव गुरुनाथा, जरि दंडा धरिसी यथार्था)
 तरि आम्ही गाउनि गाथा, तव चरणीं नमवूं माथा)
 तू तथापि दंडिसी देवा, कोणाचा मग करूं धावा
 सोडविता दुसरा तेव्हा
 कोण दत्ता आम्हा त्राता?
 शांत हो श्रीगुरुदत्ता मम चित्ता शमवी आता
 शांत हो श्रीगुरुदत्ता मम चित्ता शमवी आता
 (तू नटसा होउनि कोपी, दंडितांहि आम्ही पापी)
 (पुनरपिही चुकत तथापि, आम्हांवरि नच संतापी)
 गच्छतः स्खलनं क्वापि, असे मानुनि नच हो कोपी
 निजकृपालेशा ओपी, आम्हावरि तू भगवंता
 शांत हो श्रीगुरुदत्ता मम चित्ता शमवी आता
 (तव पदरी असता ताता, आडमार्गीं पाऊल पडता)
 (सांभाळुनि मार्गावरता, आणिता न दूजा त्राता)
 निजबिरुदा आणुनि चित्ता, तू पतीतपावन दत्ता
 वळे आता आम्हांवरता, करुणाघन तू गुरुनाथा
 शांत हो श्रीगुरुदत्ता मम चित्ता शमवी आता
 (सहकुटुंब सहपरिवार, दास आम्ही हे घरदार)
 (तव पदी अर्पुं असार, संसाराहित हा भार)
 परिहरिसी करुणासिंधो, तू दीनदयाळ सुबंधो
 आम्हा अघलेश न बाधो, वासुदेव प्रार्थित दत्ता
 शांत हो श्रीगुरुदत्ता मम चित्ता शमवी आता
 शांत हो श्रीगुरुदत्ता मम चित्ता शमवी आता
 श्रीगुरुदत्ता जय भगवंता, ते मन निष्ठुर न करी आता
 (श्रीगुरुदत्ता जय भगवंता, ते मन निष्ठुर न करी आता)
 (श्रीगुरुदत्ता)
 चोरे द्विजासी मारीता मन जे
 कळवळले ते कळवळो आता (श्रीगुरुदत्ता)
 पोटशूळाने द्विज तडफडता
 कळवळले ते कळवळो आता (श्रीगुरुदत्ता)
 द्विजसुत मरता वळले ते मन
 हो की उदासीन न वळे आता (श्रीगुरुदत्ता)
 सतिपति मरता काकुळती येता
 वळले ते मन न वळे की आता (श्रीगुरुदत्ता)
 श्रीगुरुदत्ता त्यजि निष्ठुरता कोमल चित्ता वळवी आता
 (श्रीगुरुदत्ता जय भगवंता, ते मन निष्ठुर न करी आता, श्रीगुरुदत्ता)
 (जय करुणाघन निजजनजीवन, अनसूयानंदन पाहि जनार्दन)
 जय करुणाघन
 (निजअपराधे उफराटी दृष्टी, होउनि पोटी भय धरूं पावन)
 जय करुणाघन
 (तू करुणाकर कधी आम्हांवर, रुसशी न किंकर-वरदकृपाघन)
 जय करुणाघन
 (वारी अपराध तू मायबाप, तव मनी कोपलेश न वामन)
 जय करुणाघन
 (बालकापराधा गणे जरी माता, तरी कोण त्राता देईल जीवन)
 जय करुणाघन
 (प्रार्थी वासुदेव पदि ठेवी भाव, पदी देवो ठाव देव अत्रिनंदन)
 (जय करुणाघन निजजनजीवन, अनसूयानंदन पाहि जनार्दन)
 जय करुणाघन, जय करुणाघन, जय करुणाघन
 
Audio Features

Song Details

Duration
08:43
Key
6
Tempo
112 BPM

Share

More Songs by Sanjeev Abhyankar

Similar Songs