Nivedan for Tu Mala Mi Tula

5 views

Lyrics

खरंच, कळले का कधी कुणाला जीवन?
 या जीवनाचे रंग तरी किती?
 एक रंग खोल एकाकीपणाचा
 सोबती समजून हात गुंफले होते
 त्या सावल्याच होत्या हे उमगण्याचा
 अशा रितेपणाचा हा खिन्न रंग
 कुठून कुठे आणि का निघालोय?
 हे माहिती नसण्याचा हा प्रवास
 पण हा प्रवास मध्येच थांबवता येत नाही
 चेतनेचे एक निशाण घट्ट धरून
 चालत राहायचं, चालत राहायचं
 उत्तरच नसलेले प्रश्न स्वतःलाच विचारत
 चालत राहायचं
 

Audio Features

Song Details

Duration
00:42
Key
11
Tempo
149 BPM

Share

More Songs by Sanjeev Abhyankar

Similar Songs